तुझं वावरणं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुलै २००४

तुझं वावरणं - मराठी कविता | Tujha Vavarana - Marathi Kavita

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा
मी बावरलेलो
झाडा-झाडातून पाना-पानांतून
आभाळ पिंजत

अन्‌, तुझं वावरणं
अगदीच ताऱ्यांसारख

सोबतीला असुन
संगतीला नसलेलं!

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा
मी बावरलेलो