तुझा रूसवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०१८

तुझा रूसवा - मराठी कविता | Tujha Rusawa - Marathi Kavita

नको रे रूसु तु माझ्यावरती
तुजवीण क्षण ही रहावेल का तरी

तुझ्या बोलण्यात असे प्रीतीचा गोडवा
क्षणभर विसरून जा तुझा रूसवा

तुझा रूसवा कसा मी घालवू
कळेना सांग काय मी करू

चुकले जरी मी ही शिक्षा नको मला
माफ करशील ना माझ्या प्रीत फुला

  • TAG