तु

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २०१८

तु - मराठी कविता | Tu - Marathi Kavita

तु व्यक्त सावळा मेघ
मी अव्यक्त अबोल प्राजक्त

तु धसमुसळा पाऊस
मी तुझीच सात्विक भक्त

तु दिवा असे लखलखता
मी पानांची सळसळ

तु चंद्र पौर्णिमेचा हसता
मी कळी होते सोज्वळ

तु झंकारत येतो वीणा
मी रुणझुण पैंजण होते

द्वैत मनाचे सरता
अद्वैत नाते उरते

हे असेच निर्मळ नाते
मी अमर वेल तुज बिलगते

हळुवार तु गजरा माळता
अलवार अंकुरीत होते

  • TAG