तो आणि ती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७

तो आणि ती - मराठी कविता | Toh Aani Tee - Marathi Kavita

तो प्रभातेपरि गौर सुकुमार
ती संध्येसारखी सावळी सुंदर

तो पर्वतकड्याच्या कातळापरि अढळ
ती खळाळणाऱ्या नदीसारखी चंचल

तो माध्यान्हीच्या सूर्यासम तेजस्वी
ती पुनवेच्या चांदण्यापरि कोमल

तो मृदंगावरी तांडवरूपी ताल
ती वेणूच्या गोड सुरांची माळ

तो खंबीर मुळांचे जुने वडाचे झाड
ती वाऱ्यावरती स्वार सावरी फूल

तो कडाडणारा वळीव वादळी लोळ
ती उन्हामागची श्रावणातली सर

  • TAG