तो चंद्रमा नभात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१८

तो चंद्रमा नभात - मराठी कविता | To Chandrama Nabhat - Marathi Kavita

कोजागिरीस दिसतो तो चंद्रमा नभात
प्रत्यक्ष रोज बघते मी तो तुझ्या रुपात

चंद्रास काय ठावे किती ओढ चकोरास
रमला नभी असे तो पाहून चांदण्यास

समीप तू असता कशाला पाहू चंद्रमा नभीचा
चांदणे तू चांदवा ही ऊच तू माझ्या मनीचा

रात्र काळोखी असो वा पौर्णिमा फुलली पहा
चांदवा माझ्या मनीचा देतसे मज गारवा

  • TAG