थोर इंजिनीयर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जून २०१५

थोर इंजिनीयर - मराठी कविता | Thor Engineer - Marathi Kavita

वाळवंटात राहून समजले
उन्हाळा म्हणजे काय
भुसभुशीत आहे वाळू
कुठे रोवू मी पाय

टोलेजंग इमारती आहेत
फ्लायओव्हर पिंगा घालतात
इतकी गर्मी आहे की
भावना ही वाळतात

चटका बसतो गालावर
वारा वाहताना
मृगजळ दिसते सगळीकडे
रस्ता पाहताना

चंद्र सुद्धा लाल होतो
जणू तापलेला तवा
त्यालाही मुंबईतल्या ताडगोळ्याचा
थंड घास हवा

इथे पावसाच्या सरी क्वचीत
दर्शन देऊन जातात
मायदेशातल्या चिखलाच्या आठवणीही
ब्रम्हानंद देतात

उकडलेल्या बटाट्यासारखी
मी इथे शिजतेय
थोर ते विलीस कॅरीयर
किमान ए. सी. मध्ये निजतेय