MarathiMati.com - Android App on Google Play Store

तेव्हा कळलं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ सप्टेंबर २००८

तेव्हा कळलं - मराठी कविता | Tevha Kalala - Marathi Kavita

झोपडीत बसून
चांदण्या मोजत
जगणारी मी,
तुझ्या.....
शीश महालाच्या
आश्वासनानं
बेभान, बेधुंद!
मी स्वप्नातच...
कसा असेल शीश महल ?
खरंच तुसं आश्वासन
की..?
कधी कधी
तू अस्वस्थ....
अविश्वासक
वाटत असतानाच
विवाहापूर्वीच,
मला दाखविलास
आरसेमहाल!
मी पुन्हा...
बेभानं, बेधुंद
त्याच क्षणी...
तू..
एकाच वेळी
मला दिसली
माझ्या देहाची
असंख्य लक्तरं
त्या शीशमहालात!
तेव्हा कळलं....
चांदण्या मोजत
मी
सुरक्षित होते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store