ते क्षण...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ सप्टेंबर २००८

ते क्षण... - मराठी कविता | Te Kshan - Marathi Kavita

प्रेमाच्या गोंडस नावानं
तुझ्या सहवासातले
ते क्षण...
ते होते तुझ्यातल्या
पशूचे, वासनांचे व्रण...
वाटलं तुझं कौतुक
पण,
कौतुकाचा पदर
ढळता ढळताच
तुझ्यातलं पशुत्व
समोर आलं...
तुझा लबाड चेहरा
पुसून टाकून
अंगावरचा पदर लपेटत
तुझ्यपासून दूर झाले
तुला कधीही
न भेटण्यासाठी!