तप्त उन्हाळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जून २०१५

तप्त उन्हाळा - मराठी कविता | Tapta Unhala - Marathi Kavita

का बदलतो वाट आपुली हा वारा
उजाड झाला रान सारा
का येत नाहीत धारा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

मातीत जावे मिसळून
म्हणते हे करपलेले पान
फुटू पाहतो बीजातुनी अंकुर कोवळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

ऎक रे मोकळ्या आभाळा
आण ना कापूस तो काळा
कधी वाजेल तळ्यात घुंगुरवाळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

वाट पाहतो अमृताची तो अन्नदाता
बघवत नाही ही सावली येता जाता
दाहक लाटा देऊ लागल्या कळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा