स्वतःला पाहतांना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुलै २००४

स्वतःला पाहतांना - मराठी कविता | Swathala Pahtana - Marathi Kavita

अंश-अंश हा असा माझा!
क्षितिजाशी नाते म्हणतो

अन्‌

मीच हा असा माझा
भ्रमराच्या भवती फिरतो!

दुर सावल्या गेल्या
त्या लाटेवरती साऱ्या

अन्‌

या काठावरती माझा
आभास शोधती फिरतो

संपत आले अंती
हे जीवन-गाणे सारे..

अन्‌

या जीवन गाण्यासाठी
संगीतशोधती फिरतो!