स्वतंत्रता दिवस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ ऑगस्ट २०१५

स्वतंत्रता दिवस - मराठी कविता | Swatantrata Divas - Marathi Kavita

घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट

उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका

पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय

घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास

कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय

भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान