स्वप्न

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

स्वप्न - मराठी कविता | Swapn - Marathi Kavita

ढीग झाला आता
स्वप्नांच्या सावल्यांचा
त्या ढिगाऱ्यातच
स्वप्न गाडली गेली
ढिगाऱ्याकडे बघताना
कधीतरी वारा सुटतो
ढिगारा हलतो
एखादं स्वप्न
बाहेर डोकावतं
पण...
डोकावणारं स्वप्न
आपलं वाटतच नाही
त्या स्वप्नातच
नवीन स्वप्न दिसतं
पुन्हा...
स्वप्न... स्वप्न... स्वप्न...
स्वप्नांचा ढिगारा!
पण आता,
डोळे मिटलेत
वारा सुटला तरी
स्वप्न व दिसण्यासाठी ।