MarathiMati.com - Android App on Google Play Store

स्वप्न

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ सप्टेंबर २००८

स्वप्न - स्वाती दळवी - मराठी कविता | Swapn by Swati Dalvi - Marathi Kavita

माझ्या जिवनाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवनाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवनगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...

MarathiMati.com - Android App on Google Play Store