Download MarathiMati.com's New Android App from Google Play

स्वागत आठ नोव्हेंबर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

स्वागत आठ नोव्हेंबर - मराठी कविता | Swagat Aath November - Marathi Kavita

वाढ वाढ वाढलो
किती? तर -शून्य.
आजची तारीख उद्या खोटी.
प्रामाणिक- बिमाणिक
जगलो छत्तीस वर्ष
याला काहीच अर्थ नाही?
की `जगलो' यालाच अर्थ नाही
जमेल तितका समजूतदारपणा असतोच सर्वांच्यात
मग कवी आहे म्हणजे नेमके काय?
तर नेमके नेमके कोणीच नाही
कोणीच नाही मग हे चरित्राचे गाणे कशाला?
यावर मी निरूतर
बिना चरित्राचा.
जसा
बिना दारूचा
ड्राय डे च्या दिवशी.
सबब- मी अनोळखी - आजच्या तारखेला.
त्याच्याने पडताच तर पडेल फरक
चरित्र उठून गेल्यानंतरच्या खड्ड्याला.
पण ह्या खोकल्याचे करायचे काय?
चरित्राच्या घशात अडखळतोय सारखा.
छातीत खोकला, छातीत खोकला.
विंडोसिटजवळ निवांत, पण खोकलाच.

अशाने बिनाचरित्राच्या फाईलमधून
वाढदिवस रेकॉर्ड रूपमध्ये जाईल.
चुकत माकत - खोकत खोकत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play