स्वभाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २०१७

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभावाचं घेऊन सांगतो
प्रत्येकाचा वेगळा असतो
आज पेढ्यांमध्ये थोडा
उद्या मिरचीसारखा भासतो

माणसाच्या स्वभावाला
अनुभवाची जोड मिळत असते
सर्व सारखी असली तरी
गुणांवर किंमत ठरत असते

वात्रट असला म्हणून जरी
तोडून त्यास चालत नसते
चांगले म्हणवून घेण्यास तर
आयुष्य खर्ची पडत असते

शेवटी तिखट गोड सारे तर
आयुष्याचे रंग खरे
बिनरंगाच्या आयुष्यापुढे
माणूसही मूर्ती ठरे

  • TAG