पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

सुखाच्या शोधात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ सप्टेंबर २०१६

सुखाच्या शोधात - मराठी कविता | Sukhachya Shodhat - Marathi Kavita

मनाला नेहमीच आस
लागलेली असते सुखाची
होत असते घायाळ
लागता चाहूल दुःखाची

दुःखामागून येते सुख
हे नसते त्यास ठाऊक
नसतेच दुःखात गांगरुन
होत असते भावुक

दुःखातून कळत असते
नेहमी सुखाची महती
आधी सोसल्या वेदना
तर येते सुख हाती

म्हणून कधीच पाठमोरे
होऊ नये पाहून दुःखाला
करुन त्याचा सामना
जिंकून घ्यावे सुखाला

Book Home in Konkan