स्त्री आदर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मार्च २०१८

स्त्री आदर - मराठी कविता | Stree Aadar - Marathi Kavita

झालाय सर्वत्र काळोख आता
भयभीत सारे जीवन हे
आयुष्याची देणगी स्त्रीची
बळकावू पाहतायेत नराधम सारे

लढा अस्मितेसाठी त्यांचा
फार काळ आहे जुना
नको देऊ त्रास तिला
घेईल मदमर्दिनीचा अवतार पुन्हा

प्रकाशाच्या वाटा त्यांनी
सावित्रीमाईच्या कुशीत पाहिल्या
जिजाऊंकडून जिद्द आणि
कष्ट आईकडून शिकल्या

ठेऊन भान महापुरूषांचे
आदर स्त्रीचा कर जरा
पुन्हा ताठ मानेने जगण्यासाठी
प्रोत्साहित आता कर तिला

  • TAG