स्पर्श

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जुलै २००४

आनंदघन - मराठी कविता | Anandghan - Marathi Kavita

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला

होता जरा शहारा, वेडा खुळा बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला

संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला

भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला