सोनुल्या

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ ऑक्टोबर २००८

सोनुल्या - मराठी कविता | Sonulya - Marathi Kavita

सांग चिमुकल्या सांग मला
काय हवे रे सांग तुला...

तु माझ्या अंगणीच्या गुलाब फुला
तु जणु आकाशीच्या चंद्रकला

सांग मला रे सांग मला
काय हवे रे सांग तुला...

सुर्य हवा की चंद्र हवा
हवीच पाटी का पेन हवा

काय हवे रे सांग तुला
सांग चिमुकल्या सांग मला...

चॉकलेट हवे की लाडू हवा
गाडी हवी की चेंडू हवा

नको रुसुन तु बसु असा
सांग चिमुकल्या सांग मला
काय हवे रे सांग तुला...