MarathiMati.com - Android App on Google Play Store

श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

श्री सत्यनारायणाची महापूजा - वर्ष ३२ वे - मराठी कविता | Shree Satyanarayanachi Mahapuja - Varsha 32 Ve - Marathi Kavita

अरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि
गल्लीतला दादा
झपकन आत येत तो म्हणाला,
पोलीस स्टेशनला जा आणि लाऊडस्पीकरची
परमिशन आण घोंच्यू!
मी म्हणालो,
मी पताका लावतो, थोड्याच शिल्लक आहेत
आणि खळही सुकून जाईल
महेंद्रने परमिशन आणली रिक्शा थांबवत
तेव्हा त्याचाकडून पैसे घेतले नाहीत.
देवाच्गे कार्य आहे तेव्हा संध्याकाळी दादांना भेटतो
एवढेच पोलीस म्हणाले.
तीर्थप्रसाद - भक्तीगीतं - भावगीतं - तीर्थप्रसाद.
रात्रीच्या रेकॉर्ड डान्सला मला एका मुलीचा
डान्स आवडला.
पण मी बोललो नाही काही.
त्याऐवजी कवितांचा कार्यक्रम असता तर
बोललो असतो थोडाफार.
महापूजा सालाबाद प्रमाणे शांततेत होतेय
नागरीक देवाला आणि दादाला नमस्कार करतात
कोणी येवो न येवो, देव कोपत नाही.
दादा कोपत नाही, शपथ घेऊन सांगतो.
इलेक्शनचा आणि महापूजेचा काही संबंध नाही.
दुसरे दिवशी सर्व कार्येकर्ते अध्यक्षांच्या गह्री जमतात.
हे आवडलं ते आवडलं करत रात्रभर रमतात.
महापूजेची उत्तरनशा हळुहळु खाली बसते
कवीच्या हाताने लावलेली पताका तेवढी
कित्येक दिवस फडफडत असते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store