शाळेला निरोप देताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २०१७

शाळेला निरोप देताना - मराठी कविता | Shalela Nirop Detana - Marathi Kavita

ऊर दाटून आला
भरले आसवांनी डोळ्यांना
आठवणी त्या ताज्या झाल्या
शाळेला निरोप देताना

दिवस हा आमचा शेवटचा
येणार नाही परत पुन्हा या जीवनी
सारे काही निघून जाणार
उरणार फक्त त्या आठवणी

जे घडले संस्कार
जे मिळाले ज्ञान
यांची देणार गुरुदक्षिणा
शाळेला निरोप देताना

जसा सूर्य डोंगराआडून निघावा
तसा आईने पुन्हा शाळेला जाण्यास हट्ट करावा
बालपण हे येथे संपले
आता लागणार फ्क्त ती कॉलेजची हवा

जे मिळाले नवे कौशल्य
याचे देऊन श्रेय शिक्षकांना
पुन्हा पाहणार वळून मागे
शाळेला निरोप देताना

  • TAG