Download MarathiMati.com's New Android App from Google Play

शब्दांनो बदला आता

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जून २०१४

शब्दांनो बदला आता - मराठी कविता | Shabdano Badala Aata - Marathi Kavita

शब्दांनो,
सांभाळा तुमचे अर्थ
चेहेरे बदला थोडे
खुप झाले आता
गुजरात, लिबिया, इराक
अन्‌
अफगाणिस्तानसारखे
तुमचे अर्थ
चेहेरे नसाल तर
भाषा तरी बदला तुमची
कसाब, जुन्दाल, ओबामा
ओसामा
अशा अर्थाचे शब्द
कायमचे घालवा तुमच्यातून
कुणी विवेकानंद, रविंद्र,
जिगर, मजाझ, गालिब
असे कितीतरी शब्द
तुम्ही त्यांना घातलेय वाळीत
कधीपासून
गोंजारा
अन्‌
आपलेसे करा त्यांना
मगच लाभेल
मोक्ष तुम्हा-आम्हाला

Download MarathiMati.com's New Android App from Google Play