शब्द सुंदर केवढा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २०१८

शब्द सुंदर केवढा - मराठी कविता | Shabd Sundar Kevadha - Marathi Kavita

शब्द सुंदर केवढा
पारिजातकाचा सडा
शब्द पाऊस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा

शब्द संतांच्या दारी
शब्द मंदिरात हरी
शब्द कबीराचे करी
शब्द झाले एकतारी

शब्द पाखरांच्या दिठी
तुका ज्ञानियाच्या भेटी
शब्द भीमेच्याही काठी
शब्द सिंधूच्या ललाटी

शब्द बासरीची धून
शब्द श्रावणाचे ऊन
शब्द पायात रूतून
शब्द बंबाळ अजून

  • TAG