सत्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मे २०१७

सत्य - मराठी कविता | Satya - Marathi Kavita

सत्य सर्वथा एकटेच असते
सदैव प्रश्नांच्या कचाट्यात असते
त्याच्या मैत्रीची संभावना तशी कमीच असते
ना कोणी चाहते, ना कोणी जिवाभावाचे
कटूता, अबोला, तिरस्काराने याची पुजा होते
सहवासाने सत्य समजून येते मात्र ते
अंगीकारता येईल असे घडत नाही
सत्य हा स्थाई संस्कार आहे
चिरंतन, चिरेबंदी, उंतुंग
हा सतत वाढीस लागतो
हा कठीणतम्‌ कठीण असतो
त्यात पाहू, करू, तरतूद, काही होईल
निघेल मार्ग, करू तडजोड
या शब्दांना जागा नसते
सोयीकता, कष्ट, मेहनत, अपमान
उपासमार या शब्दांची उच्चतम सीमा गाठली जाते
विलंब, दारिद्र्य, अवमान सत्याचे सख्ये खरे सोबती असतात
सत्य कोणत्याच प्रकारचे भेदभाव करत नाही
जात, धर्म, पंथ, लिंग, दिक्षा, महंत, साधू, स्वामी
यांच्या पासून सत्य दूरी राखून - टिकून असते
सत्य नेहमीच अपेक्षा रहित जीवनावर विश्वास करतं
सत्याचा प्रचार किंवा जाहिरात होत नाही
ते अनुभवावेच लागते
त्या पातळीवर आल्या विना ते गवसतं नाही

  • TAG