संदेह

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

संदेह - मराठी कविता | Sandeh - Marathi Kavita

बकऱ्याचा बळी । देवापुढे मान
भगवे पाषाण । निष्ठुरच

वाईट कृत्याचा । केला उहापोह
नको तसा मोह । नश्वराचा

पुढच्यास ठेच । मागचा शहाणा
उताविळपणा । पश्चातापी

पाऊले चालती । कुकर्माची वाट
अधोगती घाट । पुढे पुढे

सोलून चामडी । उसविला देह
तरीही संदेह । ईश्वराचा