MarathiMati.com - Android App on Google Play Store

समजू या की

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

समजू या की - मराठी कविता | Samaju Ya Ki - Marathi Kavita

मी अपराध केलाय
कविता लिहून
आणि तुमच्या पुढ्यात
सफाई करण्यासाठी
शब्द सोलून ठेवलेत.
तरीही तुम्ही विचारता?
कविता कुठाय
मी म्हणतो
तुम्ही तरी तुम्ही कुठाय?
तुम्हाला टण टण उड्या मारणारा
इतिसाहाचा बेडूक हवा असतो
किंवा
हिरव्यागार चाऱ्यावर पोसलेली शेळी
जिच्या मानेवरील सुरी होण्याचं
पसंत करता तुम्ही
तुम्हाला थेट मोकळं आभाळं हवई असतं.
हव्या त्या रंगाचं..
मी मात्र तडाजोड केली तर
तो माझ दुसरा अपराध ठरतोय.
तेव्हा माफ करा मित्रांनो.
तुम्ही पुरते वितळून गेलाहात
हिवाळ्यातल्या सावलीत
आणि
मी दुपार कवितेतल्या कोणत्याही
ऋतुसाठी राखून ठेवलेली.

MarathiMati.com - Android App on Google Play Store