साक्षीदार उपाशी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

साक्षीदार उपाशी - मराठी कविता | Sakshidar Upashi - Marathi Kavita

वाजतात इथे
अस्मितेचे ढोल
समतेचे बोल
वदनात

लावतात जीव
जीवच घेणारे
हत्या करणारे
गणगोत

एक करी खून
दुसऱ्याला फाशी
साक्षीदार उपाशी
कोठडीत

हुकूमशाहीच
सर्वांमुखी आता
हक्क स्वाधिनता
सांत्वनास