साई दरबार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०१८

साई दरबार - मराठी कविता | Sai Darbar - Marathi Kavita

साई माझा शिर्डीचा राजा
भक्तांनी भरला दरबार त्यांचा
आरतीचा स्वर गुणगुणता दरबारी
भक्तांनी केली आरतीनं दाटी
भाळदार, चोपदार करती नामाचा गजर
साईच्या नावांनी विसरले सारं
निघाली पालखी माझ्या साई राजाची
शिरावरती मुकूट घातलं जरतारी
ढोल, ताशे, नगारे दुमदुमती
साईच्या नावाचा गजर करती
सडा रांगोळी भगिणी घालती
आनंदीत ही शिर्डी नगरी जाहली
मीही असे साई चरणाची दासी
दुःख सारे विसरेन साई पाशी
पहिली माझी कविता अर्पिते साईचरणी
आपल्या कन्येस अशिर्वाद घ्यावा हीच मागणी

  • TAG