रेंगाळुनी सांज गेली

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| ७ एप्रिल २०१८

रेंगाळुनी सांज गेली - मराठी कविता | Rengaluni Saanj Geli - Marathi Kavita

रेंगाळुनी सांज गेली
मनात होते झिम्म तराणे
गहिवरल्या नजरेचे उखाणे
पुन्हा तिचे हृदयात बहाणे

वारा अबोल मुका
गातसे ते गीत नव्याने
वळणावरी तरी जरासे?
आठवणींचे भाव पुराणे

पिंजत गेलो गुज सारे
संपली नाही स्मरणे
लिहित गेलो बंध सारे
उरली नाही व्यंजने

  • TAG