पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

रंग उमलत्या पाकळ्यांचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ सप्टेंबर २००८

रंग उमलत्या पाकळ्यांचे - मराठी कविता | Rang Umalatya Pakalyanche - Marathi Kavita

अरध उमलत्या पाकळ्यांना
सांग मी पाहू कशी
गूढगर्भी लपून बसल्या
तव मनी मी पाहू कशी
स्पर्श करता जव कळ्यांना
जाती त्या कोमेजुनी
नकळे असुनी जवळी
तव मनीचे मन्मनी
जगत असता वर्तमानी
भविष्यासी कुरवाळीते
रात सरता उमलते
प्राचीवरती फूल ते
त्या फुलाच्या पाकळ्यांनी
पिसे लावियले मजसी
असुनी दाहक फूल ए
खेळ करी मम स्वप्नाशी
सरले अंतर उगवतीचे
धाव आता मावळतीशी
दूरवरच्या त्या प्राचीला
क्षणात विसरूनी जाशी
रक्त लालिमा पाकळ्यांचा
नेत्री मम मिसळीशी
रंग आता पाकळ्यांचे
सांग मी पारखू कशी?
रंग उमलत्या पाकळ्यांचे
मन्मनी भिनत गेले
फिकटत्या रंगाचेच
स्वप्न मी ना पाहिले
जाण त्यांची होत असता
कुरवाळीले दुःखासी
दोन ध्रुवावरी टांगल्या
भग्न स्वप्नांच्याच राशी

Book Home in Konkan