पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

प्रेम

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ ऑक्टोबर २००८

प्रेम - मराठी कविता | Prem - Marathi Kavita

माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे
म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फिदा आहे
तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील
स्कार्फ तू लपेटून घे
नसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे
मी जेव्हा फोन करीन धावत-धावत भेटायला ये
होत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर
टपरीवरचा फक्कड चहाच घे
वाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे
फुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे
असेच प्रेम करु जन्मभर ...
पण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा
पाहून नोकरी तू शोधून घे
यामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे
पण माझं तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे
म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फिदा आहे

Book Home in Konkan