प्रीत अशीच बहरते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०१८

प्रीत अशीच बहरते - मराठी कविता | Preet Ashich Baharate - Marathi Kavita

निळ्या आभाळी
निलांबरी तू
निशिदिनी नभी अवतरते
ये ना गं आईला बघूनी निशिकांत ही नटला
रजनीत निळाई उतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

कातरवेळी
कृष्णसावळी तू
कोमल कामालिनी होते
ये ना गं आईला बघूनी श्याम ही शामल
कुंदेची कळी उमलते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

दूर असूनी
लाजरीच तू
नित लाजाळू होते
लाख लपविते परी उलगडते
लाखात एक तू शोभते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

सोनपिवळी
पीतांबरी तू
हिरण्यवर्णी होते
धमक हळदी जणू शेवंती
सोनेरी शाल पांघरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

लाल डाळिंबी
गुलाबी कळी तू
रक्तांबुज लक्ष्मी झाली
जर्द तांबडी लाजूनी लाली
गाली हळुवार उतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

श्वेतवर्णी
शुभ्र शुभ्रा तू
धवल अप्सरा होते
नितळ काया गोरी काया
मोगऱ्यासम सुगंधित होते
सखे, बघ प्रीत अशीं च बहरते

चंदेरी जगात
चंद्रिका तू
चमचम चमकत असते
चंद्र लाजतो ये ना गं आईला पाहतो
सरस चकोरच ठरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

रंगीत राणी
रंगावली तू
आयुष्यात ही रंग भरले
रंगात रंगुनी तुझ्या संगिनी
देहात रती अवतरते
सखे, बघ प्रीत अशीच बहरते

  • TAG