पोलीस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१५

पोलीस - मराठी कविता | Police - Marathi Kavita

बरेच दिवस मनात होते काही तरी लिहावे
मग विचार केला का नाही पोलिसांच्या जीवनात डोकावून पहावे

पोलीस म्हणजे कोण एक उपेक्षित आणि गृहीत धरलेला माणूस
यांची तर सुटकाच नसते कधी संप, मोर्चे तर कधी दंगल आणि उरूस

यांचे सगळे आयुष्य जाते करण्यात बंदोबस्त
यांच्या पोटी जन्म घेतल्यावर कळते किती असतात हे व्यस्त

आपली मुले कधी मोठी झाली यांना कधी कळत नाही
चोवीस तास ड्यूटी करून यांना घराकडे बघायला वेळच नाही

दिवाळी असो की दसरा हे कुठल्याच सणाला घरी नसतात
धन्य ते कुटुंब जे नेहमी यांच्या पाठीशी असतात

कायद्याचे जर काम करावे तर राजकारणी आणि वरिष्ठांचा दबाव
तरीही बदनाम केले जातात की पैसा खाणे यांचा स्वभाव

सारखे सारखे तणावात राहून यांचा जीव उबगतो
मग आपल्याच वरिष्ठांवर गोळी घालून सगळा राग निघतो

संप मोर्चे युनियन करण्याचा यांना नाही अधिकार
सरकारच का आपणही मग थोडा करावा यांचा विचार

आजू बाजूला होणार्‍या वाईट गोष्टीकडे असूद्या लक्ष
२६/११ सारख्या घटने मध्ये मरतात पोलिस कर्तव्य दक्ष

पोलिसांना एकदातरी बनवून पहा आपला मित्र
नक्कीच आपल्याला बदलता येईल मग या समाजाचे चित्र