MarathiMati.com - Android App on Google Play Store

फणफणलेल्या रात्रीच्या

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

फणफणलेल्या रात्रीच्या - मराठी कविता | Phanphanlelya Ratrichya - Marathi Kavita

फणफणलेल्या रात्रीच्या मळक्या गाडीला आठवून
आणि कोमट सकाळ हेड ऑफिसातली
महाराष्ट्र टाईम्स रंगीत मुठीत बंद झाला तेव्हा
फुटपाथवर जुने अंक डेबोनेरचे चाळून काढले
आईचा म्हातारा त्रागा, बहिणीचं
पेंडिंग लग्न, बायकोच्या किडनीवरचई सूज
लहान मुलीचे वरचे दोन दात आणि
माझ छाताड खोल आत मुडपलेलं
विचार केला तेव्हा झाला त्रास.. पाहिला स्त्या.
हिंसा काळजाच्या गटारात चोकप चोकप
वाईट लिहिल्यावर खुन्नस आली बायकोची
पोटऱ्या दुखल्या म्हणून दारू प्यायलो फुकटची
संध्याकाळी जसलोकाला गेलो विदाऊट
आईला केव्हाही पान्हा फुटेल म्हणून आत्महत्या
नाही केली, भर समुद्रात.

जगून हिमोग्लोबीन वाढवलं रक्तातलं.

MarathiMati.com - Android App on Google Play Store