Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पाऊस ओला सांजवेळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७

पाऊस ओला सांजवेळी - मराठी कविता | Paus Ola Sanjveli - Marathi Kavita

पाऊस ओला सांजवेळी
अन् कवितेच्या काही ओळी
मीच हरवले मनात माझ्या
कुठल्या देशी, कुठल्या काळी

जिथे पावले घेऊन आली
त्याचीच पाऊलवाट झाली
चालत चालत कुठवर आले
निमिशरेषाही संपून गेली

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play