Download MarathiMati.com's New Android App from Google Play

परिस्थितीच्या आरशात केस काळे करताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

परिस्थितीच्या आरशात केस काळे करताना - मराठी कविता | Paristhichya Aarshyat Kes Kale Kartana - Marathi Kavita

साऱ्या कर्तृत्वाचे केस पांढरे झाले ऐन वयात
आई म्हणाली
लग्न कर ऐन वयात
न्हावी म्हणाला
कर्तृत्वालाच मेहंदी फास
बहीण म्हणाली
केसच ते ऐनवयात पांढरे झाले तर
नंतर होत नाहीत
मी परिस्थितीच्य आरशात डोकावून पाहिले
माझ्या पाठीमागे आई, न्हावी, बहीण उभे
आई म्हणाली
हलकट असतात सर्व जाती.
न्हावी म्हणाला
तात्पुरते उपाय सोडून द्या.
बहीण म्हणाली
पांढऱ्या केसांचा भाऊ
मी भादरून घेतला सारा समाज
आणि पांढऱ्या केसांनीच
ऐन रस्त्यावर आलो.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play