पहिले पाऊल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ एप्रिल २०१५

पहिले पाऊल - मराठी कविता | Pahile Paul - Marathi Kavita

आज सकाळी ऊठुन आरशात मी पाहिले
गालावरचे गुलाब आता उमलू लागले
नवलाईचे बोल जणू ओठात साठले
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले

बेधूंद मन माझे रानावनात बागडे
कळी चिमुकली पहा मला पाहून बहरे
घुंगरु हे पायातले किती मंजूळ वाजते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले

विचारांचे मेघ मनामध्ये हे दाटले
जुन्या वार्‍यानेही मह माझ्या मनाला गाठले
आठवणींचे छोटेसे तळे साचले
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले

आई पदर तुझा अलगद मी सोडते
जगातले व्यवहार हळुहळु उमजते
सम्स्काराचा दिवा हाती धरुन चालते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकते

आता चांदण्यामध्ये मी माझे स्वप्न शोधते
फुलपानांचे सौदर्य पापण्यात लपवते
असा शब्दांना गुंफून गीत माझे सजवते
तरुणाईच्या वाटेवर पहिले पाऊल टाकते