पहिला पहिला पाऊस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८

पहिला पहिला पाऊस - मराठी कविता | Pahila Pahila Paus - Marathi Kavita

पहिला पहिला पाऊस अंगावर होता
गार गारवा झोंबला अंगाला
पावसाच्या सरित मात्र स्पर्श तुझाच होता
ओठ होते बंद माझे
मनात गाणे आपल्या प्रीतीचे
स्मृतींनी गेला कंठ दाटुनी
मातीतून उठला गंध कस्तुरी
उदास निर्जीव वेलीला
आठवणीचा बहर फुलुनी गेला
पहिला पहिला पाऊस अंगावर होता
पहिला पहिला पाऊस अंगावर होता

  • TAG