Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पायवाट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० सप्टेंबर २००८

पायवाट - मराठी कविता | Paayvaat - Marathi Kavita

पायाखालची वाट
सरत होती
मी मात्र
तिथंच!
वाटेच्या हिशेब करतं!
बाळपणीच्या फोटोत
दुडुदुडु धावणारी वाट
शाळेच्या रस्त्यात हरवली
नव्या रस्त्यात भेटली
अनेक स्वप्नं... आदर्श
ती स्वप्नं रंगवत
आदर्शांचा मागोवा घेत
शाळेचा रस्ता ओलांडला,
महानगरासारख्या कॉलेजात
केवळ रस्ता नव्हता...
होते चौक...
एकाच वेळी अनेक वाटा जोडणारे
भुलभुलैय्या ठरणारे...
आपली वाट कोणती
कळलंच नाही...
रस्सीखेच...!
वेगवेगळ्या वाटेनं ओढली गेले
त्या ओढण्यात
आपली वाट सापडलीच नाही
प्रत्येकवेळी दुसऱ्यानेच वाट दाखवली
त्याना हवी ती...
कालांतरानं सगळे
आपापल्या वाटेनं गेले,
आणि मी...
मी बसले आडवाटेत
कुठं जायचं याचा विचार करत...

Download MarathiMati.com's New Android App from Google Play