पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पावसाळा नव्याने

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जुलै २०१५

पावसाळा नव्याने - मराठी कविता | Paavsala Navyaane - Marathi Kavita

सरींसवे सरूनी गेले
भर्कन उडूनी गेले तास
नभी भरलेल्या काजळासवे
नव्याने दाटला मनी उल्हास

निळे, पोपटी, हिरवे, पिवळे
लख्खं मला दिसु लागले
तेच रंग त्या उन्हात
नव्याने भोवती फिरू लागले

चिंब भिजुनी चमकणारे
समोरच उभे बकुळ होते
त्याची रेखीव फुले वेचाया
नव्याने आज व्याकुळ होते

स्वतःस झोकुनी देती सरी
मातीच्या असीम प्रेमासाठी
मनात झिरपुनी अर्थ देतात
नव्याने त्याच रेशीमगाठी

झरझर सरसर कोसळणारे
क्षण कुणी मोजले का?
आज त्याच पावसामध्ये मी
नव्याने अशी भिजले का?

Book Home in Konkan