पाऊस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जुलै २०१५

पाऊस - मराठी कविता | Paaus - Marathi Kavita

आल्या धावत बघ या सरी
हसल्या त्या मंजिरी
नेसली धरेने हिरवी पैठणी
हे वर्णन जुने झाले, सॉरी

वाहनं करतात साजरी
सकाळ संध्याकाळ गटारी
डोलत डोलत जाते स्वारी
खरं आहे खड्ड्यांची नशाही न्यारी

हातात बॅग किंवा दप्तर पाठी
डबक्यात धडपडून चिखलाला मिठी
फवारा उडवणार्‍या गाडीची भिती
शिव्यांचा डोंगर पावसासाठी

तुंबलेले रस्ते घरात तलाव
खाडी नद्यांचा तापट स्वभाव
ऑफिसला सुट्टी मिडियाला भाव
आनंद देणारे फक्त भजी वडापाव

वार्‍यासारखे पसरतात आजार
पावसाने घेतले बळी हजार
जितके कौतुक तितकाच धिक्कार
पावसाशी नाते? इट्स कॉम्पिकेटेड यार