पाऊस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ सप्टेंबर २०१५

पाऊस - मराठी कविता | Paaus - Marathi Kavita

मंद धुंद गारवा ओल्या मातीचा सुवास
वार्‍यासोबत पाऊस ढग करतो लांबचा प्रवास

झिरमिर झिरमिर पाऊस धारा ओली चिंब झाली धरा
कण कण ऊमलून येतो घेऊन नाविन्याचा ध्यास

दूर कोठे डोंगरात मयूर ठेक्यात करतो नाच
इंद्रधनुषी सप्तरंगात देव मुगुटाचा होतो भास

तन मन चिंब चिंब कुठे बुडाले सूर्यबिंब
चंद्र चंद्र चांदण्याचा येतो सुखाची घेऊन रास