पाऊस गातो गाणे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जुलै २०१५

पाऊस गातो गाणे - मराठी कविता | Paaus Gaato Gaane - Marathi Kavita

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा