पाणी जीवनाचे अमृत

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| ११ एप्रिल २०१८

पाणी जीवनाचे अमृत - मराठी कविता | Paani Jivanache Amrut - Marathi Kavita

पाणी हे जीवनाचे अमृत आहे
नको मानवा करु त्याची नासाडी

नदी पात्रात टाकूनी केरकचरा
प्रदुषित करीशी तु त्या पाण्याला
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा
अर्थ आपल्या जीवनात आचरशी
पाण्याचा टाळूनी अपव्यय
जल संवर्धन करीशी या पाण्याचा

पाणी हे जीवनाचे अमृत आहे
नको मानवा करु त्याची नासाडी

जल संकट येता
भटकंती होई या पाण्यासाठी
पशु पक्षी व्याकुळ होती
याच पाण्यासाठी
पाण्याचे जतन करणे
हीच काळाची गरज

पाणी हे जीवनाचे अमृत आहे
नको मानवा करु त्याची नासाडी

  • TAG