निसर्ग रंगात रंगुया

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| १६ मार्च २०१८

निसर्ग रंगात रंगुया - मराठी कविता | Nisarg Rangat Ranguya - Marathi Kavita

निसर्ग रंगात रंगुया
सरगम सुर हे आपण छेडूया
निसर्ग रंगात आपण सारे रंगुया

पाऊल वाटेच्या दुतर्फां झाडांची हि दाटी
मन जाई हा मोहूनी निसर्गाने
तन-मन होई प्रसन्न, रे प्रसन्न

खळ खळ वाहे हा झरा
देत चाहूल या निसर्गांची
मातीचा हा सुगंध दरवळे चहुकडे
निसर्गांची या किमयाच न्यारी

सरगम सुर हे आपण छेडूया
निसर्ग रंगात आपण सारे रंगुया

  • TAG