पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

नवं स्वप्न पाहू दे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २०१७

नवं स्वप्न पाहू दे - मराठी कविता | Nava Swapn Pahu De - Marathi Kavita

काळोखात माझ्या आज मला राहू दे
चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहु दे
हळव्या काट्यांचे रंग जरा लेऊ दे
हरवलेल्या वळणाकडे पुन्हा पुन्हा पाहू दे

आयुष्यात जिंकणं जरुरीचं नाही
कधीतरी मागे सोडावं काही
नेहमीच कशाला पुढे जायची घाई
आजतरी मला सर्वात मागे राहू दे

चढावा कुठवर घाट यशाचा
अपयशाचा तळ आजतरी पाहू दे
काळोखात माझ्या आज मला राहू दे
चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहू दे

  • TAG
Book Home in Konkan