नवं काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ सप्टेंबर २००८

नवं काय? - मराठी कविता | Nava Kaay - Marathi Kavita

तुझी पावलं स्थिरावली
अन्‌ म्हणालास…
नवी पावलं टाक...
पावलं नवी असतात कां?
बर...
ज्या मातीवर ती टाकायची,
ती माती?
नवी असते का...?
अनेकांच्या पाऊलखुणा
आपल्यावर उमटवणारी
ती माती...?
वेगळ्या वळणावरच्या
मातीवर उमटणारी
ती पावलं...
नव काय?
तुझ्या सहवासात
चाललेली पावलं
की...
एकटीनं टाकायची पावलं...
नव काय...?
आता फक्त
नव्या उमेदीनं
स्वतःच्या पायावर
उभं रहाणचं
महत्त्वाच...!