नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २०१८

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण - मराठी कविता | Naisargik Saundaryane Natalela Konkan - Marathi Kavita

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत
त्याचा मला अविरत अभिमान आहे

उंच उंच डोंगर रांगा
जणू नैसर्गिकता जपत आहे
रस्त्यांची नागमोडी वळणे
निसर्गाचा थाट सांगत आहे

खळखळ वाहती झरे
जसे वाटे सुमधूर संगीत गात आहे
पक्षी करती किलबिलाट
होऊन जाई मन प्रसन्न

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत
त्याचा मला अविरत अभिमान आहे

हापूस आंबा कोकण भूमीची
शान आहे
करवंदे, काजू, फणस
हे इथे रानमेवा आहे

कोकण भूमी अनेक
रत्नांची खाण आहे
विविधतेत एकता ही
अनेक दशके टिकून आहे

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत
त्याचा मला अविरत अभिमान आहे

  • TAG