Download MarathiMati.com's New Android App from Google Play

ना उमेद मी कधीच नव्हते

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० सप्टेंबर २००८

ना उमेद मी कधीच नव्हते - मराठी कविता | Na Umed Kadhich  Navhate - Marathi Kavita

'ना उमेद' मी कधीच नव्हते
आडात नाही ते पोहऱ्यात शोधत होते
आणि हातात असतानाही गावभर हिंडत होते
ह्रदयात असुनही देवळात जात होते आणि
दगडासमोर डोके फोडुन जखमी मात्र होत होते
'ना उमेद' मी कधीच नव्हते

तरीही जगण्यासाठी डोळेझाकुन काहीतरी शोधत होते
डोळे झाकण्याची चुक माझीच असतानाही
ठेचाळणाऱ्या दगडालाच रागवत होते
प्रयत्न अपुरे असतानाही दैवावरच डाफरत होते
पण आळशीपणाने गोंजारलेल्या माझ्याच लहरी
मनाला आता मी सुनावणार आहे
की 'ना उमेद मी कधीच नव्हते

Download MarathiMati.com's New Android App from Google Play