न सापडलेलं प्रेम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जुलै २०१५

न सापडलेलं प्रेम - मराठी कविता | Na Sapadlela Prem - Marathi Kavita

क्षणात एका टोचलेलं
खोल दरीत पोहोचलेलं

तिथेच डुंबत बसलेलं
न बोलता रुसलेलं

ओठात कधी मिटलेलं
कागदास कधी भेटलेलं

पापणीच्या आड हसलेलं
मनात माझ्या वसलेलं

उशीच्या कुशीत निजलेलं
स्वप्नाळु जगात सजलेलं

असून सुद्धा नसलेलं
पण आरशात मात्र दिसलेलं

न सापडलेलं प्रेम...